आपल्या विचारांच्या विरुध्द बोलणाऱ्यांना अर्बन नक्षल म्हणून अडकवण्याचा मागच्या सरकारचा हा प्रयत्न होता – गृहमंत्री

anil-deshmukh

नागपूर :- राज्यातील तात्कालीन सरकार असं होत की, ज्याने त्यांच्या विरुध्द किंवा त्यांच्या विचारांविरुध्द आवाज उठवण्याचा स्वत:चे विचार मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याला अर्बन नक्षल म्हणून संबोधायचं, अशा प्रकारचा प्रयत्न मागच्या सरकारने केला.

तीनही पक्षांतील महत्त्वाकांक्षी लोकांमुळेच सरकार कोसळेल : रावसाहेब दानवे

त्यामुळे अत्यंत नामवंत लेखक, कवी, विचारवंत यांची चौकशी सुरु झाली. ही चौकशी आहे ती मागच्या सरकारने जाणीव पुर्वक सुरु केलेली चौकशी आहे. आपल्या विचारांच्या विरुध्द बोलणाऱ्यांना अडकवण्याचा मागच्या सरकारचा हा प्रयत्न होता. म्हणूनच शरद पवारांनी सांगीतलं लवकरात लवकर SIT लावून जो तपास चुकीच्या मार्गाने चालला होता तो योग्य दिशेने व्हावा हीच मागणी होती. अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.