सुरिनामचे राष्ट्रपती असतील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

PM Narendra Modi - Chandrikapersad Santokhi

नवी दिल्ली : सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी (Chandrika Prasad Santokhi) २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात (Indian Republic Day Parade) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मूळ भारतीय वंशाचे संतोखी राजपथ संचलनामध्ये सहभागी होऊ शकतात असे पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी माहिती देताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी १६ व्या अनिवासी भारतीय दिन सम्मेलनाला डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केले. या संमेलनात सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

आधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार होते. मात्र ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनचा उद्रेक झाल्यानंतर त्यांनी भारत दौरा रद्द केला.

भोजपुरीत बोलले

गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ व्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाला डिजिटल संबोधित केले. या कार्यक्रमात सूरीनामचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे होते. मुख्य संबोधन त्यांचेच होते. त्यांनी आपले संबोधन भोजपुरीत केले! ते म्हणाले, ‘भारत के प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी जी, मेरे प्यारे प्यारे भारतीय प्रवासी भईया और बहना लोगन, हमार ओर से आप लोगों को राम जोहार पहुंचे। का हाल बा? हमार देश सूरीनाम आप सब लोगों को अभिनंदन प्रस्तुत करिला.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER