ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही तर, टिपू सुलतान जयंती साजरी करणारी, फडणवीस गर्जले

Balasaheb Thackeray - CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

बेळगाव : बेळगाव (Belgaum) लोकसभा मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडुकीच्या प्रचाराच्या तोफा चा प्रचार आज सायंकाळपासून थंडावल्या. तत्पूर्वी विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज अखेरच्या दिवशी बेळगावात जाऊन भाजप (BJP) उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली. आताची शिवसेना बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) राहिलेली नाही तर टिपू सुलतान जयंती (Tipu Sultan) साजरी करणारी झाली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला (Congress) मदत करण्यासाठी आले आहेत, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

ही बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की, महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर छापत आहे. यामध्ये बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहलं जातं. महाराष्ट्रात शिवसेना आता टिपू सुलतान जयंती साजरी करत आहे. म्हणूनच जी काँग्रेस टिपू सुलतान यांची जयंती साजरी करते त्यांना निवडून देण्याकरिता शिवसेनेचे नेते बेळगावता आले.

महाराष्ट्र एकीकरण समितीला समोर ठेवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे. छत्रपतींना मानणाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टिपू सुलतान की जय म्हणणाऱ्यांच्या गळ्यात हार टाकत असाल, तर मराठी खांदा तुम्हाला पाठिंबा देणार नाही. आम्ही जात पात धर्म मानत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजप मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे. माझा सवाल संजय राऊत ना आहे, मराठी मणुसला मुंबईत बेड नाही मरतो आहे त्याची चिंता का करीत नाही? त्यांचे प्रेम बेगडी आहे. सध्या गजात कोरोना महामारी आहे. देशात सर्वात कमी मृत्यूदर आहे. मोदींनी सर्वांचा विचार केला. गरिबांपर्यंत अन्न पोहोचलं पाहिजं याचा मोदींनी विचार केला. मोदींनी मोठे आर्थिक पॅकेज देऊन त्यांनी सर्वांना आधार दिला. आज जगातले केवळ पाच दिवस फक्त कोरोनावर लस तयार करु शकले. यामध्ये भारत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button