आताची शिवसेना ही नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही : भाजपची टीका

Maharashtra Today

मुंबई :अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत शिवसेना आणि एमआयएमने युती केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी युती केल्यामुळे अमरावती मनपाच्या या निवडणुकीची चर्चा राज्यभर रंगत आहे. भाजप(BJP) नेत्यांनी शिवसेना(Shivsena) आणि एमआयएमच्या(AIMIM) या युतीवर टीकास्त्र सोडले आहे.

भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी देखील टीका करत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेची आठवण करून दिली आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यासाठी सत्तेचा विचार करणारी, टिपू सुलतान ची जयंती साजरी करणारी, आणि आता अमरावतीत AIMIM सोबत आघाडी स्थापन करणारी ही शिवसेना नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची शिवसेना असूच शकत नाही, असे भाष्य पाण्डेय यांनी केले आहे.

उद्धव जी एमआयएम हा तोच पक्ष आहे ज्याच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं की १५ मिनिटांसाठी या देशातील पोलीस बाजूला ठेवा, आम्ही हिंदूंचे काय हाल करू हे पूर्ण देश पाहील. आणि आज आपण त्या एमआयएम सोबत सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या सोबत आघाडी करता आहात. आपण हिंदुत्वाची तर तिलांजली दिलीच आहे. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांना पण आपण तिलांजली दिली आहे.’ अशी टीका देखील संजय पाण्डेय यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER