चुकीचे कामे दाखवण्यातच सद्याचे सरकार व्यस्त – देवेंद्र फडणवीस

महिला अत्याचाराबाबत कठोर कायदा केल्यास आमचा पाठींबाच

devendra fadnavis

ठाणे :- माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नक्कीच मोठ्या प्रमाणात झाड लावलेली आहेत..त्याच जीवो टागिंग झालं आहे..मागच्या सरकारने कसं चुकीचं काम केलंय हेच दाखवण्यात साध्याच सरकार व्यस्त असून सध्याचे हे सरकार आकस बुद्धीने वागत आहे. आमचा सर्व कारभार पारदर्शी आहे,आम्ही सरकारमध्ये असताना जी मोठी रेषा मारलीय, त्यापेक्षा या सरकारने मोठी रेषा मारावी. असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

ही बातमी पण वाचा : विश्वासघात झालाच आहे, मात्र आता रडायचे नाही तर लढायचे : देवेंद्र फडणवीस

शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली. छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थाने ते करून दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत जागृती निर्माण केली असून मुठभर मावळ्यांसोबत छत्रपतींनी करून दाखवलं. खरं न्यायाचं राज्य केले,शिवरायांची शिकवण विसरला तर,महाराष्ट्र धर्म टिकणार नाही असे देखील यावेळी फडणवीस यांनी सांगितले. ठाण्यातील शिवाजी मैदानात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा च्या शिवजयंती कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते.

दरम्यान या कार्यक्रमात महाराजांच्या गड आणि किल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते, यावेळी अनेक गड, किल्ले हुबेहूब बनवण्यात आले होते. हे गड किल्ले येथे बघण्यात आनंद जितका आहे तसा आनंद प्रत्यक्षात जाऊन बघण्यात असल्याचे फडणवीस यांनी सांगत, या संकल्पनेचे स्वागत करून प्रदर्शन पाहिले. यावेळी शिव संग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेठे, आमदार रवींद्र चव्हाण, ठाणे भाजप अध्यक्ष निरंजन डावखरे, भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला अत्याचाराबाबत कठोर कायदा केल्यास आमचा पाठींबा

महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, त्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे. त्या बाबत आम्हीं सहकार्य करू असे देखील फडणवीस यांनी सांगितलं. ठाण्यातील शिवाजी मैदान येथे आयोजित शिवजयंती उत्सवानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.