कृतज्ञता आणि शुभचिंतनाची ताकद

meditation

कोरोना (Corona) सारख्या विषाणूच्या भयाकर अशा लाटेमध्ये सगळे जग होरपळून निघाले. या महामारीतुन कोणीच सुटले नाही. श्रीमंत-गरीब, उमराव, उपेक्षित. आणि त्यामुळे सगळ्या मानवजातीला दाराआड कोंडून घ्यावे लागले. अक्षरश: जग बंद पडण्याचा अनुभव होता तो. हळूहळू लोक सावरत आहे. नेहमीप्रमाणे मी म्हणते तसे मनुष्य हा अतिशय आशावादी प्राणी आहे. नेहमी तो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून वर भरारी मारणारा. त्यामुळेच या काळामध्ये अनेक अनुकूल गोष्टी, आवाहन पेलून लोकांनी केल्या. अनेक लोकांची सर्जनशीलता, चिंतन, व्यासंग, मनन त्यांनी केले. हे बघताना लंडनच्या वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेल्या एका गोष्टीची आठवण आली. त्यांनी लिहिलं होतं की, १६८० मध्ये प्लेगची साथ लंडनमध्ये निर्माण झाली, यासाठीच या रोगापासून बचाव म्हणून न्यूटन याने आपल्या गावचा रस्ता धरला. विरळ वस्तीच्या गावाकडे तो राहिला लागला. आणि तिथेच एका झाडाखाली बसलेला असताना त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तिथे त्याला चिंतनाला भरपूर वेळ मिळाला होता किंवा त्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी फायदा करून घेतला होता. त्याला एक आव्हान मानले होते.. म्हणूनच प्लेग मुळे न्यूटन नावाचे वरदान जगाला लाभले. असे म्हटले जाते.

पण तज्ञांच्या मते मात्र आता यापुढेच खरी कसोटी लागणार आहे. ही कसोटी जीवनाचा सगळ्या स्तरांवर असेल. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवन अशा रीतीने ढवळून निघेल की कदाचित त्याची कल्पनाही कोणी केलेली नसेल. असेही काही विचारवंत काही ठिकाणी बोलून दाखवतात. जगात बहुसंख्य लोक बेकारी, अनिश्चितता आणि अरिष्ट, याने वेढले जातील.

अशी मतमतांतरं होत असतानाच एका बाजूने आपली संस्कृती, विचार, चिंतन-मनन या मार्गाने अनेक लोक यातून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन करणारे ही आहेत, त्या-त्या तत्त्वज्ञानाचे बोट पकडून जर मार्गक्रमण केले तर निश्चितपणे मार्ग दिसू शकतो. असे अडथळे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी मार्ग दाखवणारे अनेक संत महंत यातूनच आजपर्यंतची प्रगती होत आली.

फक्त दुर्दैव एवढेच की संत जी शिकवण देतात, त्याबद्दल तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात एक समजूत आहे आणि ती म्हणजे संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी एकमेकांपासून भिन्न आहेत. म्हणजे संसारी माणसाला परमार्थ करणे शक्यच नाही असा मला वाटतं. आणि संसारातून बाहेर पडणं मला जमणारच नाही. अशा रीतीने परमार्थ करणाऱ्या लोकांनी भौतिक प्रगतीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, तर संसारात एकापाठोपाठ एक उत्कर्षाच्या पायऱ्या चढणार यांनी परमार्थाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि हे फार पूर्वापार चालत आलेले आहे.

आज मी उल्लेख करणार आहे, तो एका जीवनविद्येचा. जीवन विद्या म्हणजे काय ?तर जगण्याच विज्ञान. यशस्वी आणि समतोल, सुसंगत जगण्याची विद्या ! ही विद्या जीवन जगण्याची कला शिकवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सद्गुरु श्री वामनराव पै. सद्गुरूंनी आपली मंत्रालयातील मोठ्या हूद्याची नोकरी सोडून संसार सुखाचा केलाच, परंतु परमार्थ हे साध्य केला. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ हे शिकवलं. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा तरुणांचा उत्कर्ष त्यांच्या हातात कसा आहे तरुणांनी करिअर कसं निवडावं व जीवनात यशस्वी होण्यासाठी कौटुंबिक सौख्य कसे जपावे मनस्वास्थ्य राखावा हे संग्रह जीवनविद्या सांगते.

आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर मनाचा व्यवस्थापन शिकावे लागतं. या मनात व्यवस्थापन शिकवण्याचं काम अनेक संतांनी केले, अनेक कवींनी पण याचं वर्णन केलं.

आजची परिस्थितीही तशीच झालेली आहे, दैन्य दुःख अनिश्चितता असंतोष बेकारी आर्थिक असमतोल अशा अनेक गोष्ट बाजूंनी आपण बघितल्याप्रमाणे शांतता हरवलेली आहे. त्यासाठी काय काय करावे लागेल तर वामनराव पै म्हणतात त्याप्रमाणे मनाचे व्यवस्थापन म्हणजे १) मनाला आवरणं २) मनाला सावरायचं, ३) मनाला सजवायचं ४) मनाला जोडायचं शास्त्र या चार गोष्टींनी आयुष्यामध्ये येणाऱ्या बहुतांशी समस्यांचं निराकरण होईल असं ते म्हणतात.

त्यापैकी पहिलं म्हणजे मनाला आवरण, आपण माझे बघितल्याप्रमाणे मनच आपल्या शत्रू आणि आपला मित्र असतं. लावला तर ते मुलासारखा लढवतो आणि मार दिला तर त्या मुलासारखं कोडगं पण होतं. ते क्षणात भूतकाळात तर क्षणात भविष्यकाळात जात पण वर्तमान काळात मात्र काही टिकत नाही. स्थैर्याचा अभाव हेच मनाचे वैशिष्ट्य. वामनराव पैं म्हणतात की “स्थिर मन हे सुखाचा सागर तरसतील मन हे दुःखाचा आगर आहे.”आपणही मागे बघितल्याप्रमाणे आपण जिथे असतो तिथे नसतो. आपण आपलं काम हे भूतकाळाच्या अनुभवाच्या आधारे करणे आणि भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असते.

वर्तमानात जगणं ही एक साधना आहे आणि ते सवयी हळूहळू जमतं दुसरी साधना म्हणजे मंत्र म्हणं त्यासाठी त्यांनी विश्वप्रार्थना म्हणायला सांगितली आहे विश्‍वाच्या कल्याणासाठी असणारी ही प्रार्थना. दुसरा टप्पा म्हणालास सावरणं. चंचल असणाऱ्या मनाला, अस्थिर सतत नव्या सुखाच्या शोधात असणार्या मनाला ध्यास असतो तो अजून काहीतरी नवीन, आहे त्यापेक्षा नवीन, ये दिल मांगे मोर चा ! आणि यात असते कम्पॅरिझन. यात माणूस दोन मार्गांकडे वळू शकतो. एक म्हणजे अमंगल गोष्टी करण्याकडे बेकायदेशीर अनैतिक गोष्टींकडे. किंवा मंगल गोष्टींकडे अध्यात्माकडे. म्हणूनच संगत धरतांना सदैव सावध असले पाहिजे असे म्हणतात. जीवनात चार प्रकारच्या माणसांची संगत लाभू शकते. १) वाट लावणारे २) वाट पाहणारे ३) वाट शोधणारे ४) वाट दाखवणारे. सद्गुरू म्हणतात की वाट लावणार या माणसांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर तिथूनच अधोगतीला सुरुवात होते. काही माणसं स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्याला काय करू देत नाही अशा संगतीमुळे आपण प्रयत्न करणं सोडून देतो. वाट शोधणारे प्रयत्नवादी असतात आणि प्रेरणादायी पण असतात. तर वाट दाखवणारे हुशार शहाणे अनुभवी असे असतात.

मनाला सजवण्या मागे त्यांची भूमिका अशी की माणूस अगदी सहज नकारात्मक विचार द्वेष मत्सर तिरस्कार करतो त्याचा परिणाम एका बाजूनी परिस्थिती अधिकच बिकट होऊन मनस्वास्थ्य बिघडण्यावर होते. मनाला सजवायचं म्हणजे चांगले यशाचे आनंदाचे आरोग्याचे ऐश्वर्याचे विचार केले पाहिजे.

या कालावधीमध्ये अनेकांचं मानसिक स्वास्थ्य हरवलं. त्यावर काळजी करत बसणे सतत प्रॉब्लेम आहे असं म्हणत बसणे यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारून जर सतत शुभचिंतन केलं जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर कृतज्ञता या भावनेमध्ये इतकी शक्ती आहे की तुमच्या साठी सर्वात चांगली व पूरक पोषक परिस्थिती नक्कीच निर्माण करण्याची ताकद या साधनेमध्ये आहे सध्याच्या या कठीण परिस्थितीत जीवन मानसिक स्वास्थ्य जपले जाईल अशी खात्री सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारातून मिळते.

मनाला जोडणार म्हणजे एका बाजूने ज्ञानेंद्रियं मार्फत जगाला जोडलं जाणं आणि एकीकडे चैतन्यशक्ती जोडलं जाणं. इतकी सुंदर कल्पना आहे ही की मन जेव्हा जगाला सन्मुख असतो तेव्हा हा व्यक्ती प्रपंचात असते आणि तेच मंजर जर ईश्वराला सन्मुख झालं तेव्हा ती व्यक्ती परमार्थात असते.

आणि फ्रेंड्स ! जीवन विद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत मला खूप आवडला,”आपण सर्व जण एकमेकांना जोडलेले आहोत!”कारण पण आपल्या मध्ये जी चैतन्यशक्ती ती वास करते ती सगळ्यांमध्ये एकच आहे आपलं सध्याचा अंतर्मन तिला म्हणजे परस्परांना जोडलेले आहे. या भावनेतून जितकी माणसं जास्त जोडाल तितके जास्त यशस्वी आपण होऊ शकतो आपला उत्कर्ष होऊ शकेल. म्हणूनच शत्रू किंवा मित्र कुणाही बाबत नकारात्मक बोलू नये किंवा त्याचा विचार मनात येताच त्याचा सगळा भलं होऊ दे हाच विचार आणि शुभचिंतन करावं ! वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै हे याला “इंटरनल कम्युनिकेशन “म्हणतात आणि याचा परिणाम अतिशय प्रभावी असल्याचा अनुभव येतो असा त्यांनी एका लेखात म्हटले आहे. तेव्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन, कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER