जे जे स्कुल ऑफ आर्टस्चा अहवाल सादर होण्याची शक्यता

ठाणे : थीम पार्कच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या पहिल्या बैठीकीत तांत्रिक निवृत्त अधिकारी नसल्याने या बैठकीमध्ये कोणत्याच स्वरूपाची चर्चा झाली नव्हती . बुधवारी या संदर्भात दुसरी बैठक आयोजित करूनही अद्यापही तांत्रिक निवृत्त अधिकारी मिळाला नसल्याने आज होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याबाबत मात्र प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे . चौकशी समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे . तर जे जे स्कुल ऑफ आर्टस्च्या माध्यमातून आलेल्या अहवाल देखील या बैठकीत ठेवला जाणार असल्याची शक्यता असल्याने हि बैठक महत्वाची ठरणार आहे .

मागील महिन्यात 26 ऑक्टोबर २०१८ रोजी थीम पार्कच्या प्रकरणाची चौकशी करणा:या समितीची पहिली बैठक झाली होती. परंतु या बैठकीत सेवा निवृत्त अधिकारी घेण्यावरच चर्चा झाली. परंतु कोणताही ठोस असा निर्णय झाला नव्हता.

या समितीच्या वतीने गिरीष मेहेंदळे यांचे नाव घेण्यात आले होते. परंतु त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यानंतर पालिकेतील अनेक सेवा निवृत्त अधिका:यांना याबाबत विचारणासुध्दा करण्यात आली. परंतु अद्यापही हा अधिकारी मिळत नसल्याने पहिली बैठक झाल्यानंतर दोन महिने हि बैठक लावण्यात आलेली नव्हती. आज दुसरी पुन्हा चौकशी समितीची बैठक महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लावण्यात लावण्यात आली असून या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होणार असून जे जे स्कुल ऑफ आर्टस्चा अहवाल देखील सादर करण्यात येण्याची शक्यता आहे . त्यामुळे चौकशीला वेग मिळेल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे .

दुसरीकडे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नेमलेल्या स्वंतत्र चौकशी समितीने या थीम पार्कची पाहणी केली असून त्यांच्याकडून या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. या चौकशी समितीमध्ये महापौर समितीच्या अध्यक्षा असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला , हणमंत जगदाळे ,सभागृह नेते नरेश म्हस्के,विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील,भाजपचे नगरसेवक नारायण पवार,मिलिंद पाटणकर ,स्थायी समिती सदस्य राम रेपाळे,यासिन कुरेशी हे सर्व सदस्य असून सर्व सदस्य उपस्थित राहण्यावरच या बैठकीचे भवितव्य अवलंबून आहे .