अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून राजकीय भूकंपाची शक्यता, तनपुरेंनी केला दावा

Prajakta Tanpure

अहमदनगर : जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर आता राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, ते आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत यांची नावे वेळ आल्यावर मी नक्की करेल, असंही तनपुरे म्हणाले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणारयाची चर्चा रंगली आहे. तसंच जे नाराज नेते आहेत त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा दावा मंत्री तनपुरे यांनी केला आहे.

“आमच्या पक्षात सर्वांचा योग्य मान-सन्मान ठेवला जातो. छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्याचा आदर करायची आमची संस्कृती आहे. आमच्या पक्षात सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवला जातो, हे राम शिंदे यांना लवकरच कळेल. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांचा उचित सन्मान करेल. शरद पवारसाहेब एकनाथ खडसेंना योग्य तो न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाने एकनाथ खडसे यांना खूप छळले. त्यांच्यावर अन्याय केला गेला. शेवटी त्यांनी कंटाळून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा योग्य निर्णय घेतला. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आमची ताकद नक्कीच वाढली आहे. तसंच पवारसाहेब त्यांना नक्की न्याय देतील, असा विश्वास तनपुरेयांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER