चीनचे रॉकेटवरील नियंत्रण सुटल्यास पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता; पृथ्वी संकटात

China's Out Of Control Rocket

अंतराळात स्वत:चे स्पेश स्टेशन तयार करण्याच्या महत्वाकांक्षेतून चीनने (China) पाठवलेले एक रॉकेट आता संपूर्ण जगाची डोकेदुखी होऊन बसले आहे. हे रॉकेट कधीही पृथ्वीवर (Earth) कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

मिळेलेल्या माहितीनुसार, अंतराळात सध्या रॉकेटचा मुख्य भाग फिरतो आहे. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता आहे. रॉकेटचा हा भाग जवळपास १०० फूट लांब आहे. याचे वजन तब्बल २१ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात चीनचे एक रॉकेट पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरामध्ये पडले होते. या रॉकेटचे नाव लाँग मार्च ५- बी वाय-२ आहे. अंतरळात चीनकडून तयार करण्यात येत असलेल्या तियानहे स्पेस स्टेशनसाठी त्याला अंतराळात पाठवण्यात आले होते. मात्र, पृथ्वीवर येत असताना चीनचे या रॉकेटवरील नियंत्रण सुटले. आता हेच रॉकेट कधीही पृथ्वीवर पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल २५,४९० किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला ७.२० किलोमीटर गतीने फिरत आहे. या रॉकेटची रुंदी १६ फूट असून चीनने त्याला २८ एप्रिल रोजी अंतराळात सोडले होते. सुमारे २९ हजार किमी प्रतितास वेगाने प्रवास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button