स्वतःला वाघ समजणाऱ्या लांडग्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू : रूपाली चाकणकर

Rupali Chakankar

पुणे : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही अनेक आरोप झाले. आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर (Rajesh Vitekar) यांच्यावर एका महिलाने तृप्ती देसाईंच्या मदतीने बलात्काराचा आरोप केला आहे. यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. या बाबतीत चाकणकर यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

चाकणकर यांनी म्हटले की, “प्रतिष्ठित व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा अनेकांनी व्यवसायच मांडला आहे. या अशा लोकांच्या व्यवसायावरच स्वतःला वाघ समजणाऱ्या अनेक लांडग्यांचा राजकीय उदरनिर्वाह चालू आहे.” चाकणकर यांच्या टीकेला भाजपने यावर काही प्रत्युत्तर दिलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button