मराठा आरक्षणावरून काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे : अशोक चव्हाण

ashok-chavan

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड असल्याचा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. त्यावरुन आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याचे चव्हाण म्हणाले .

“मराठा समाजाला EWSच्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. तेव्हा संभाजीराजे, विनायक मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित ठेवला. मात्र, SEBCच्या उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा म्हणून काहीजण कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने 12 ते 13 प्रकरणात EWSचं आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून कसं रोखू शकतो?”असा प्रश्न विचारत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान 25 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काही चूक झाली तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. त्यावर मराठा आरक्षण टिकले पाहिजे अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी पुढील सुनावणीच्या दृष्टीने राज्य सरकारची तयारी सुरु असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER