पुलवामा स्मृतीदिनीच घातपाताचा कट उधळला

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे आज रविवारी पुलवामा स्मृतीदिनी दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळण्यात आला. सुरक्षा दलाने जम्मू बसस्टॅण्डजवळ तब्बल सात किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली असून मोठा अनर्थ टळला आहे.

पुलवामा हल्ल्याला (Pulwama attack) आज दोन वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होता. पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने २०१९ मध्ये पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. आज जम्मूमध्ये गर्दी असलेल्या सामान्य बसस्टँडजवळ स्फोटके सापडली. यानंतर जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील बारी ब्राह्मणा भागातील कुंजवाणी येथून पोलिसांनी दोन प्रमुख दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER