राजीव गांधी यांच्या अपहरणाचा डाव पाकिस्तानवरच उलटवला आणि बांग्लादेश जन्माला आला!

Maharashtra Today

गुप्तेहर संघटना कुणाला कानोकान खबर न देता कारवाई करत असतात. या कामात त्यांना यश येवो की अपयश याचा स्वीकार कधीच कोणतंच राष्ट्र करत नाही. असंच एक ऑपरेशन ज्याचा स्वीकार भारतानं केला नाही. नाव होतं ‘गंगा हायजॅकिंग.’ (Ganga Hijacking) या ऑपरेशनमुळं १९७१ च्या लढाईत पाकिस्तानची आर्धी ताकद रॉच्या ऑपरेशनमुळं संपली होती.

१६ वर्षाच्या मुलानं केलं होतं विमानाच अपहरण

३० जानेवारी १९७१ जम्मु काश्मिरहून श्रीनगरला उड्डाण करण्यासाठी एअर इंडीयाचं विमान तयार होतं. विमानचं नाव होतं ‘गंगा.’ तेव्हा १६ वर्षाच पोर वैमानिकाच्या केबिमध्ये घुसलं आणि त्यानं वैमानिकावर बंदूक तानली. विमानात २७ प्रवासी होते. प्रवाशांना घडल्या प्रकाराबद्दल काही कळायच्या आत १९ वर्षाच्या अशरफ कुरेशीनं विमानात प्रवेश केला. त्याचा हातात ग्रेनेड होतं. हे पाहून प्रवासी घडला प्रकार समजले, त्यांचा विमानाचं अपहरण करण्यात आलंय ही बाब त्यांच्या लक्षात आली. हाशिमनं वैमानिकाला आदेश दिला, विमानानं उड्डाण केलं पण उतरलं पाकिस्तानच्या लाहोरमध्ये. विमानातले सारे प्रवासी खाली उतरवण्यात आले. नंतर संपूर्ण प्रकार समोर आला. पिस्तूल लाकडी होती. ग्रेनेड नकली होता. एकूण काय तर विमान अपहरणाचा बनाव करण्यात आला होता. ही सगळी चाल भारतीय गुप्हेर संघटना रॉ म्हणजेच ‘रिसर्च अँड अॅनालिस विंग’ची असल्याच्या बातम्या आल्या.

रॉनं रचला होता प्लॅन

२ जानेवारी १९७१ ला ‘अल- फतह’ नावाच्या दहशवादी संघटनेच्या काही नवख्या आतंकवाद्यांनी जम्मू- काश्मीर बँकेवर दरोडा टाकला. काहींना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसी खाक्या दाखवताच ती कवळी पोरं बोलती झाली. सीमेच्या पलिकडं मोठा कट शिजत असल्याच त्यांनी सांगितलं. या चौकशीत रॉचे सदस्य सामील होते. आता बारी होती रॉची. पुढची चाल ते खेळणार होते.

रॉनं हाशिम कुरेशी नावच्या १६ वर्षाच्या मुलाला काश्मिरला पाठवलं. त्याचं वय १६ असलं तरी तो रॉचा एजेंट होता. तिथं त्याची भेट ‘जम्मु- काश्मिर लिब्रेशन फ्रंट’च्या मकबुल बट्टशी झाली. हाशिमनं तिथं जाऊन गट बदललाय आता त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’नं जबाबदारी दिली. विमानाच्या अपहरणाची. ते विमान ज्याचा पायलट असेल देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींचा पुत्र, राजीव गांधी. विमान अपहरणाचं पुर्ण प्रशिक्षण त्यानं घेतलं. तो भारतात परतला. बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सच्या जवानांनी त्याच्यावर संशय घेतला. खोल चौकशी केली तर त्यानं या कटाची माहिती दिली.

कट आहे असाच ठेवण्यात आला. फक्त विमान बदलण्यात आलं. विमानच्या या अपहरणाची नोंद ‘गंगा हायजॅकिंग’ अशी करण्यात आलीये. या गुप्तहेर संघटनेच्या ऑपरेशनचा स्वीकार न भारतानं केला न पाकिस्ताननं पण रॉचे माजी अधिकारी आर. के. यादव यांनी लिहलेल्या ‘मिशन रॉ अँड एडब्ल्यू’मध्ये या घटनेचा उल्लेख केलाय. या खुलास्यामुळं नाराज झालेल्या हाशिम कुरेशी यांनी यादव यांच्याविरुद्ध केसही ठोकलीये.

आणि पाकिस्तानं जाळ्यात अडकलं

जेव्हा विमान श्रीनगरहून लाहोरला पोहचलं तिथून खरा किस्सा सुरु होतो. ‘आयएसआय’ला वाटलं की राजीव गांधी स्वतः विमान घेऊन शत्रु राष्ट्रात दाखल झालेत. हायजॅकिंग यशस्वी झाल्याच्या आनंदात ते होते. पण पाकिस्ताननं रचलेला कट पाकिस्तानवरच पलटला. विमानाच्या अपहरणाचा बहाना करत भारतानं पाकिस्तानवर हवाई क्षेत्रात येण्याची, पाकिस्तानच्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. म्हणजे जी विमानं थेट लाहोर वरुन ढाक्याला जाणार होती ती आधी २८०० किलोमीटर जास्तीचा प्रवास करत श्रीलंकेच्या कोलंबोला जायची आणि तिथून ढाक्याला पोहचायची.

राजीव गांधी तर हाती लागले नाहीत. भारतीय प्रवाशांना पाकिस्तानात ठेऊन तर काय करणार होते. त्यांनी प्रवाशांना परत पाठवलं आणि सोबत हाशिमला सुद्धा. या घटनेमुळं पाकिस्तानी गुप्हेतर संघटना ‘आयएसआय’ची इभ्रत निघाली. सर्वांना माहिती होतं की गंगा हायजॅकिंग मागं रॉचा हात आहे पण कुणीच या गोष्टीला स्वीकारलं नाही.

पाकिस्तानी सैन्याचा डाव उधळला

पुर्व पाकिस्तान ज्याला इंदिरा गांधींनी स्वतंत्र करुन बांग्लादेश बनवलं. तिथं १९७० ला निवडणूका होत्या. शेख मुजबुल रेहमान सरकार बनवतील याची सर्वांनाच खात्री होती. पाकिस्तान सैन्याला रेहमान यांच सरकार बनू द्यायच नव्हतं. निवडणूका झाल्यानंतर बंगालात मोठी आनागोंदी माजवण्याच्या तयारीत पाकिस्तानी सैन्य होतं पण भारताच्या या अपहरण नाट्यामुळं त्यांच संपुर्ण लक्ष या घटनेकडं खेचलं गेलं.

१९७१ ला निवडणूका झाल्या रेहमान यांनी सत्ता ताब्यात घेतली. पाकिस्तान युद्ध पुकारलं पण वेळ निघून गेली होती. हवाई सैन्यासाठी भारतीय वायुक्षेत्र बंद होतं. नौसेनेला वेळ जास्त लागणार होता. भारतानं पाठिंबा दिला. आणि पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून बंग्लादेशची मुक्तता झाली. तो स्वतंत्र देश बनला. हे सारं घडवून आणण्यात ‘गंगा हायजॅकिंगचा’ मोठा हात होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER