आयपीएल-२०२० मधून बाहेर झालेला हा खेळाडू आहे ऑरेंज कॅपचा दावेदार; पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराह यांच्यात टक्कर

Jasprit Bumrah - Kagiso Rabada

आयपीएल-२०२० (IPL 2020) शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. १३ व्या हंगामाचा विजेता काही तासांनंतर घोषित होईल. इतकेच नाही तर दुबईत होणाऱ्या विजेतेपद सामन्यानंतर इतर अनेक विजेत्यांचीही घोषणा केली जाईल. दिल्ली आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या या सामन्यासमवेत ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि पर्पल कॅप (Purple Cap) विजेताही ठरविला जाईल. सध्या दोन्ही ट्रॉफीचे दोन-दोन स्पर्धक आहेत.

प्लेऑफ सामन्यानंतर सर्वाधिक धावांच्या यादीत किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आघाडीवर आहे. त्याने १४ सामन्यांत ५६ च्या सरासरीने आणि १२९ च्या स्ट्राइक रेटने ६७० धावा केल्या आहेत. या दरम्यान राहुलने पाच अर्धशतके आणि शतक झळकावले. त्याचा संघ पहिल्या चारमध्ये राहू शकला नाही आणि प्लेऑफमध्ये पोहचण्यापासून चुकला.

राहुलशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याने १६ सामन्यांत ४६.३८ च्या सरासरीने आणि १४५ च्या स्ट्राइक रेटने ६०३ धावा केल्या आहेत. सध्या धवन राहुलच्या धावांच्या तुलनेत ६७ धावांनी मागे आहे आणि त्याला हे साध्य करण्याची संधी आहे. अंतिम सामन्यात मुंबईविरुद्धच्या सामन्यात हे अंतर संपवून तो ऑरेंज कॅप जिंकू शकतो. विशेष म्हणजे धवनने आतापर्यंत चार अर्धशतके आणि दोन शतके खेळी केली आहे. सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांमध्ये, म्हणजे पर्पल रंगाच्या कॅपचे दावेदार येथेही दोन गोलंदाजांमध्ये स्पर्धा आहे.

सध्या दिल्लीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा (Kagiso Rabada) १६ सामन्यांत २९ विकेट्ससह अग्रस्थानी आहे आणि पर्पल कॅपचा प्रमुख दावेदार आहे. दुसरीकडे मुंबईच्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) १४ सामन्यांत २७ बळी घेतले आहेत. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडूंचे संघ समोरासमोर उभे राहतील, अशा प्रकारच्या या यादीमध्ये बदल पाहायला मिळू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER