पायलट टेक ऑफ करणार! राजस्थान सरकारवरचे संकट कायम, कॉंग्रेसची आज पुन्हा बैठक

Sachin Pilot - Ashok Gehlot

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे तुमचं म्हणणं ऐकण्यास तयार आहेत, असंही ते म्हणाले. चर्चेतून वादावर तोडगा काढू असं सांगत सुरजेवाला यांनी मंगळवारच्या बैठकीसाठी सचिन पायलट यांना आमंत्रण दिलं आहे .


जयपूर : कॉंग्रेसचे मातब्बर नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने राजस्थान मधील गहलोत सरकार अडचणीत सापडले आहे. पायलट यांचे रविवारचे बंड, सोमवारची कॉंग्रेसची बैठक या बैठकीत 109 आमदारांचा पाठींबा असल्याचे गहलोत यानी जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात गहलोत यांच्याकडे ८४ आमदारांचाच पाठिंबा असल्याचा दावा सचिन पायलट यांच्या गटाने केला आहे.

त्यानंतर पायलट यांच्या कार्यालयाकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यावरू आता गहलोत आणि पायलट गटात ‘व्हिडिओ वॉर’ सुरू झाला आहे. त्यामुळे पायलट अखेर टेकऑफ घेणार हे निश्चित मानले जात आहे. तर, पायलट यांच्या बंडामुळे संकटात सापडलेले राजस्थान सरकारवर अद्याप संकट कायम असून कॉंग्रेसने आज पुन्हा बैठक बोलावली आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुन्हा काँग्रेसने सचिन पायलट यांना आमंत्रण दिले आहे. तसेच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पायलट यांना चर्चेचे आवाहनदेखील केले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे तुमचं म्हणणं ऐकण्यास तयार आहेत, असंही ते म्हणाले. चर्चेतून वादावर तोडगा काढू असं सांगत सुरजेवाला यांनी मंगळवारच्या बैठकीसाठी सचिन पायलट यांना आमंत्रण दिलं आहे. पण सचिन पायलट यांनी काँग्रेसचे आवाहन फेटाळून लावले व आपण या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असं पायलट यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER