आसाममधील चित्र स्पष्ट; भाजपचे पुन्हा बहुमताचे सरकार

Maharashtra Today

नवी दिल्ली : पाचही राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम( Assam), पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. सुरुवातीचे काही कल हाती यायले लागले आहेत. यात आसाम निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा बहुतपेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर कांग्रेस पिछाडीवर आहे.

आतापर्यंतच्या निकालानुसार आसाममधील एकूण १२३ जागांपैकी ८३ जागांवर भाजपने आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसने ३९ जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. मात्र सुरूवातीच्या कलानुसार भाजपने आपला गड कायम राखण्यात यश मिळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button