पश्चिम बंगालच्या जनतेने आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले; काँग्रेसची मोदींवर टीका

PM Narendra Modi - Sachin Sawant - Maharashtra Today

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विजय निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी “जनता होरपळत असताना पंतप्रधानपदाची जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. जनतेने या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले. ” असे ट्विट करून मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली.

मोदींच्या अतिमहत्त्वाकांक्षेला जनतेने धूळ चारली

सावंत यांनी म्हटले आहे की, सत्तापिपासू वृत्तीने पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या मोदीजींच्या अतिमहत्त्वाकांक्षेला बंगालच्या जनतेने धूळ चारली आणि या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले. जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button