पश्चिम बंगालची जनता ममतांना कधीही माफ करणार नाही – अमित शहा

Amit Shah - Mamata Banerjee

दिल्ली :- पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राज्याला सर्व क्षेत्रात मागे ढकलले आहे. पश्चिम बंगालची जनता ममतांना कधीही माफ करणार नाही, अशी टीका भाजपाचे (BJP) नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केली. अमित शाह व केंद्रीयमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने हावडा येथील भाजपाच्या रॅलीला संबोधित केले.

शहा यांनी ट्विट केले – तृणमूल काँग्रेस (Congress) आणि अन्य पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील. राज्यातील जनतेबरोबर त्यांनी अन्याय केला आहे. त्यांनी पश्चिम बंगलला प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर नेलं आहे. राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.

अमित शाह (Amit Shah) यांनी आरोप केला की, “ममता दीदी बंगालच्या जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळू देत नाहीत, कारण ही योजना मोदींनी सुरू केली. मी बंगलाच्या जनतेला विश्वास देतो की, भाजपाचे सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडू की राज्यात ही योजना लागू व्हावी. ममता दीदीने मागील काही दिवसांमध्ये एक कागद पाठवला आहे की, आम्ही शेतकरी सन्मान निधी योजना लागू करण्यासाठी सहमत आहोत. दीदी तुम्ही कुणाला फसवत आहात, केवळ कागदच पाठवला आहे. त्यासोबत शेतकऱ्यांची यादी देखील पाहिजे, बँक खाते क्रमांक पाहिजे, तुम्ही हे काहीच पाठवलेले नाही.”

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. आता आणखी पाच नेत्यांनी अमित शाह यांच्या उपस्थित कमळ हाती घेतले. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळाले आहे. तर तृणमूल काँग्रेस आणखी एक हादरा बसला आहे.

तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अमित शाह यांनी ट्विट करून याची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER