‘नाणार’च्या समर्थनात नाणारवासीयांनी घेतली मंत्री आव्हाड यांची भेट

- ८ हजार ५०० एकर जमिनीच्या मालकांच्या सह्यांचे सम्मतीपत्र दिले

Jitendra Awhad - Nanar

नाणार : नाणार (Nanar) प्रकल्प व्हावा यामागणीसाठी आज नाणारच्या नागरिकांनी राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भेट घेतली. ८ हजार ५०० एकर जमिनीच्या मालकांच्या सह्यांचे सम्मतीपत्र आव्हाडांना देण्यात आले. याबाबत खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) मुख्यमंत्र्याना भेटू देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.आधी, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे व आंब्याचे नुकसान होईल अशी आम्हाला खोटी भीती दाखवण्यात आली होती, असे ते म्हणाले.

राजकारणासाठी प्रकल्पाबाबत आमची दिशाभूल करण्यात आली. संबंधित १४ गावांमधील ८० टक्के लोकांचे या प्रकल्पाला समर्थन आहे, असे या नागरिकांनी आव्हाडांना सांगितले. प्रकल्पाच्या समर्थनासाठी लोकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. स्थानिक आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून आम्ही आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही आमची दखल घेतली नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीला आलो आहोत, असे या नागरिकांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले.

प्रकल्पासाठी अजून सुमारे ३ हजार एकर जमीन लागणार आहे. याबाबत या नागरिकांनी सांगितले की, जमिनीचा मोबदला अजून घोषित करण्यात आलेला नाही. मोबदल्याची रकम घोषित झाल्यानंतर जमीन देण्याला असलेला विरोध पूर्ण मावळलेला असेल.

प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेली जमीन खडकाळ आहे. तिथे काही पिकत नाही. या जमितीवरील २७ देवळे हलवावी लागतील असे सांगितले होते. आम्ही याची फेरपाहणी केली तेव्हा लक्षात आले की यातील फक्त ३ देवळे हलवावी लागणार आहेत. या भागात फारशी वस्ती नाही त्यामुळे पुनर्वसन हा मोठा प्रश्न नाही. महत्त्वाचे म्हणजे आधी गैसमजामुळे ८० टक्के लोक या प्रकल्पाच्या विरोधात होते आता ८० टक्के लोक याच्या समर्थनात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER