जनता हेच सर्वात मोठे न्यायालय; मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील आक्रमक

Abasaheb Patil - Maharashtra Today

कोल्हापूर :- मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषद घेतली. मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झाले. आता आरक्षणावरून पळवाटा काढायचे काम सुरू आहे, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी केला.

जनता हेच सर्वात मोठे न्यायालय आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही. आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचे याचे स्पष्टीकरण द्या. सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावं. तसंच ओबीसींप्रमाणे फी माफी करावी, अशी मागणी यावेळी आबासाहेब पाटील यांनी केली.

सरकार आणि प्रशासन यांच्यात स्पर्धा परीक्षांमधून निवड झालेल्या मुलांच्या निवडी रद्द करण्याचा हालचाली सुरू आहेत. असा प्रयत्न झाल्यास मराठा समाजाची मुले मंत्रालयात घुसतील, असा इशारा देताच जनता हेच सर्वात मोठे न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही. मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विनंती आहे. अशोक चव्हाण यांच्याकडून जबाबदारी काढून घ्यावी, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली. अन्यथा निर्णय होईपर्यंत महाराष्टात कोणतीही भरती होऊ देणार नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास एकाच वेळी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू, असा इशारा ठोक मोर्चाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button