पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

Amol Mitkari - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा ६.३ जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा देखील फडणवीस यांना नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव श्री सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजीनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे, असा घणाघात मिटकरी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER