पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाहीये, तर हा पक्षाच एक कुटुंब : सुप्रिया सुळे

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य केले .

राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाहीये, तर हा पक्षाच एक कुटुंब आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद (CM) मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Govt) टीका नक्की करा, पण वैयक्तिक टीका करू नये, असा सल्लाही त्यांनी भाजपला (BJP) दिला.

भविष्यात तुमचं राजकारण महाराष्ट्रात असणार का? असा सवाल विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी बारामतीतून निवडून आले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्यामुळे महाराष्ट्राशिवाय (Maharashtra) मला दिल्ली मिळणारच नाही’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

तसंच, ‘राज्याच्या स्थैर्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करावे लागले. याआधी पुलोदचा प्रयोग झाला होता. लहानपणी बागुलबुवाची गोष्ट वाचली होती. त्याचा इतका गाजावाजा झाला की, बागुलबुवा येणार येणार अशी चर्चा झाली पण शेवट काही घडले नाही. उत्तरप्रदेश, गुजरात व्यतिरिक्त भाजपला इतर राज्यात सत्ता मिळवताना कठीण झाले होते. मध्यप्रदेशमध्ये तोडून फोडून सरकार स्थापन केले. जे काही चाणक्य वगैरे गप्पा मारण्यात आल्या त्याचा फुगा बंगालच्या निवडणुकीनंतर फुटला होता, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button