…तर रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता; जयंत पाटलांचा टोला

jayant Patil - Maharastra today

पुणे : जर आम्हाला यापूर्वी माहिती असते तर रेमडेसिविरसाठी सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. औरंगाबाद हायकोर्टाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर लोकप्रतिनिधी रेमडेसिवीर घेऊन त्यांचे वितरण करत असेल तर वैद्यकीय यंत्रणेस रेमडेसिवीर मिळविणे कठीण होईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील हे मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुजय विखे-पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या रेमडेसिविरच्या वादग्रस्त खरेदीवर भाष्य केले. आम्हाला आधी कळले असते तर आम्ही रेमडेसिवीरची गरज असलेले रुग्ण आणि डॉक्टरांना सुजय विखेंचा नंबर दिला असता. पण या उद्देशाने राजकीय हेतूने काम करणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटलांनी आरोप फेटाळले

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनासारख्या महामारीकाळात नगर जिल्ह्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी फेटाळून लावला. चंद्रकांत पाटील बोलतात त्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. हसन मुश्रीफ नगर जिल्ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पुण्यात बसून नगरची मापे काढण्याचा प्रकार सर्वांनी बंद करावा, असे जयंत पाटील म्हणाले.

त्याचबरोबर, अजित पवार यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. त्यांचे सर्व जिल्ह्यांवर नजर आहे. कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पुण्यात येऊन निवडणूक लढले, ते निवडूनही आले. त्यामुळे आता पुण्यासाठी काहीतरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी ते अजित पवार यांच्यावर टीका करत आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button