बीएमसी निवडणुकीत मनसेबाबत पक्ष विचार करेल- प्रवीण दरेकर

Pravin_Darekar

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मनसेसोबत जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत भाजपचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना बोलते केले असता, मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) भाजप स्वबळावर लढणार आहे. बाकी निवडणूक जाहीर झाल्यावर बघू. मनसेबाबत पक्ष विचार करेल, असं म्हणाले. राज ठाकरेंच्या वीज बिल माफीच्या आंदोलनात भाजपनेही (BJP) सहभाग नोंदवला. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे-भाजप एकत्रित दिसणार अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेनेसोबत (Shiv Sena) काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. दोन्ही पक्षांकडून कधीच युतीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही; परंतु दरेकरांनी गरज पडल्यास युती करण्याचे एकप्रकारे संकेत दिल्याचे दिसते.

दरम्यान, बिहार विधानसभा आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सुशिक्षित तरुणांनी भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येईल, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. “राज्यातील आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत.

त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला यंदा यश मिळेल. गेल्या काही दिवसांत बिहार आणि देशाच्या इतर भागांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पदवीधर तरुणांना भाजपला मतदान केल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही हाच ट्रेंड कायम राहील. ” असे दरेकर यांनी सांगितले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER