भारतात क्रिकेटची सुरुवात करणारा पारसी समुदाय या कारणांमुळं क्रिकेटपासून दुर गेला!

Maharashtra Today

क्रिकेट(cricket) हा खेळ समुद्रमार्गे इंग्रजांसह भारतात आला. बरेच दिवस तो इंग्रजांचा खेळ म्हणूनच राहिला. मायदेशापासून हजारो किलोमीटरवर राहणारे इंग्रज, भारताच्या उष्णकटीबंधाला वैतागले की क्रिकेटमध्ये मन रमवायचे आणि भारतीय तो खेळ पहायचे. नंतर इंग्रज खेळत असलेल्या या खेळाच्या भारतीय करणाला सुरुवात झाली. भारतीय आपल्या पद्धीतीनं आपल्या नियमानं हा खेळ खेळू लागले. पहिल्यांदा इंग्रजांविरुद्ध हा खेळ खेळणारे भारतीय सर्व तरुण पारसी होते. तेव्हाच्या बॉम्बेमध्ये पारंपारिक पारसी पोषाखात क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या पारसी पोरांनी क्रिकेटचा पाया रचला.

मुंबईच्या पारसी समाजातील ( Parsi community)युवकांनी भारतात क्रिकेटची सुरुवात केली. एका मोठ्या कालावधीपर्यंत लोकांना क्रिकेटबद्दल कुतुहल होतं. भारताच्या एकूण लोकसंख्येत अल्पसंख्येच्या पारसी युवकांनी भारतात क्रिकेटचा पाया रचला. यानंतर एक वेळ अशी आली की भारतीय क्रिकेट संघात एकाच वेळी चार पारसी खेळाडू पारसी होते. नंतर पारसी समाजानं यातून काढता पाय घेतला, ‘फारुख इंजिनिअर'(Farooq Engineer) शेवटचा खेळाडू होता. जे १९७५ पर्यंत भारतीय क्रिकेट टीमचा हिस्सा होते. त्यानंतर कोणत्याच पारसी युवकाला भारतीय टीममध्ये खेळताना पाहिलं नाही.

पारसी समुदाय क्रिकेटपासून का दुरावला गेला याचं उत्तर शोधण्या आधी तो क्रिकेटशी जोडला कसा गेला, इंग्रजांना फारसी लोकांसोबतच का क्रिकेट खेळू वाटलं याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. इस्लामचं प्राबल्य तेव्हाच्या ‘फारस’मध्ये म्हणजे इराणमध्ये वाढू लागलं आणि तिथल्या लोकांनी विस्थापन करत जगभरातल्या देशात आपले पाय जमवले. व्यापार आणि व्यवसायात पारसी समाजानं प्रगती केली. याला मोठं कारण आहे की तत्कालीन हिंदू समाज व्यापाराला हीन कृत्य मानायचा. याचा फायदा पारसी लोकांना झाला. त्यांना स्पर्धकच नव्हते.

इंग्रजांनी भारत ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा पारसी लोकांनी विरोध केला नाही. त्यांनी मध्यस्थीचा रस्ता अवलंबला. भारतात राहणाऱ्या पारशांनी इंग्रजांचा प्रतिकार करण्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करत, इंग्रजांना व्यापारात मदत करु लागले. कायदा आणि प्रशासनात त्यांनी स्वतःच स्थान मजबूत केलं. इंग्रजांशी त्यांनी तेव्हा मैत्रीपुर्ण संबंध बनवले जेव्हा इतर भारतासाठी इंग्रज शत्रु होते. राजे राजवाडे इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी लढाया लढत होते. कालांतरानं इंग्रजांनी एकएक राज्य जिंकलं. सत्ता प्रस्थापित केली. युद्ध आणि व्यापारातून त्यांना बराच मोकळा वेळ मिळू लागला. हा मोकळा वेळ त्यांनी क्रिकेटमध्ये गुंतवला. इंग्रजांच्या खेळात इंग्रजांचे पारसी मित्रही सहभाग नोंदवू लागले. इंग्रज विरुद्ध पारसी असे क्रिकेट सामने मुंबईत सुरु झाले.

कालांतरानं मुंबईतील पारसी लोकांमध्ये क्रिकेट प्रसिद्धीस पावलं. १८५० ते १८६० सया कालावधीत ३० पारसी क्रिकेट क्लब बनले. पारसी समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘कोवासाजी जहांगीर’ यांनी त्यावेळी पेपरात जाहिरात दिली होती की निवदेन देणाऱ्या प्रत्येकाला क्रिकेटचं किट मोफत दिलं जाईल. पारसी समुदायात प्रसिद्धीस पावलेल्या या खेळाशी नंतर राजकारण्यांनी स्वतःला जोडून घेतलं.

ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या मुंबईत क्रिकेट सामने झाले. स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. आधी इंग्रज आणि पारसी अशा दोनच टीम क्रिकेट खेळायच्या नंतर यात हिंदू टीम आणि मुस्लीम टीमचा समावेश झाला. १९०६ नंतर चार संघात हे सामने भरु लागले. पारसी संघानं क्रिकेटला गांभीर्यानं घेतलं होतं. त्यांनी सर्व संघांवर विजय मिळवला होता. इंग्रजांशी मैत्री टिकवण्यासाठी पारसी क्रिकेट खेळत नव्हेत. जिंकण्यासाठी क्रिकेट खेळणं पारसी समाजानं २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांनी सुरु केलं.

नंतरच्या काळात परिस्थीती बदलली. हिंदू आणि मुस्लीम समुहांनी क्रिकेटमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. पारसी समाजाची क्रिकेटमधली एकाधिकारशाही संपुष्टात आली. इंग्रजांबद्दल सहानभुती असणाऱ्या पारसी समाजाला नंतर माध्यमांनी इतकं महत्त्व दिलं नाही. इंग्रजांचा पराभव करणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम संघांना तुलनेत जास्त प्रसिद्धी मिळाली कारण माध्यम या दोन टीमच्या जिंकण्यात स्वातंत्र्य लढ्याचं यश शोधत असायची.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक पारसी खेळाडूंनी मैदान गाजवलं. भारतीय क्रिकेटमध्ये पारसी आणि मुंबईचा दबदबा होता. १९८७३ पर्यंत तो टिकला. ८३ ला विश्वचषक जिंकल्यानंतर देशातल्या गल्लीबोळत क्रिकेट पोहचलं. क्रिकेट श्रीमंतांचा खेळ राहिला नाही. नंतर सर्वच लोक यात उतरले. पारसी बाजूला फेकले गेले.

पारसी क्रिकेट वाचवण्यासाठी पारसी क्लबनी पुढं यावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई पारसी पंचायतीचे अध्यक्ष दिनेशॉ मेहता यांनी युवकांच्या क्रिकेटप्रति असणाऱ्या प्रेमाबद्दल त्यांची कानउघडणी केली होती. तासंतास युवकांनी व्यवसाय सोडून अनिश्चित असणाऱ्या क्रिकेटच्या भविष्याकडं लक्ष देणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळं व्यवसायिक दृष्टीकोनसुद्धा पारसी समुदायाला क्रिकेटपासून दुर ठेवताना दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button