पाकिस्तानी सैन्याला पुरुन उरला होता ‘हा’ राबडी पशुपालक समाजातील गुप्तेहर !

The Pakistani army was left to fend for itself.-Ranchoddas Pagi

१६ डिसेंबर १९७१, भारतीय फौजेनं पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध जिकलं. भारतीय सैन्यानं पराक्रमाची शर्थ केली. अनेकांना वीर मरण आलं. पण त्यांनी देशाची गरिमा ढळू दिली नाही. या गोष्टीला ५० वर्ष व्हायला आली तरी या महापराक्रमी सैन्याचे किस्से भारतीयांच्या ओठांवर आजही आहेत.

पण आपल्यापैकी खुप जणांना बासनकंठाच्या राबडीयांबद्दल माहिती असेल. ज्यांच्या अनोख्या कौशल्यामुळं १९७१ आणि १९६५ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्यानं विजय मिळवला होता.

रणछोडदास पागी नावाचा राबडी गुप्तहेर

गुजरातच्या वाळवंटात राबडी नावाचा समाज आढळतो. म्हैशी, उंट पाळणे. त्या हिंडवण्यासाठी भटकंती करणे. हे या समाजाचे काम पण याच भटकंतीनं गुजराच्या वाळवंटाची खडानं खडा माहिती त्यांना अनेक वर्षांपासून होती. १९६५ आणि १९७१च्या निर्णायक युद्धात भारतीय सैन्याच्या विजयात मोठा वाटा होता या राबडी समाजाचा. आणि या समाजाचे नायक होते रणछोड पागी.

‘रणछोड पागी’ (Ranchoddas Pagi) नावाच्या व्यक्तीनं १९६५ आणि १९७१च्या युद्धात भारतीय सैन्याच्या विजयाचा पाया रचला. महत्त्वाच्या पोस्टी जिंकण्यासाठी त्याच्या बुद्धीचार्तुयाचा उपयोग झाला.
वर्ष १९६५ गुजरातच्या थार वाळवंटातून कच्छच्या मैदानात एप्रिल महिन्यात पाकिस्तानची घुसखोरी सुरु झाली होती. ऑगस्टपर्यंत भारत पाकिस्तान सीमा रणमैदानात बदलली.

युद्धाला सुरुवात झाली तेंव्हा बासनकाठच्या लिंबाला गावात उंट आणि म्हैशी पालन करणाऱ्या राबडी समाजातील रणछोड पागी यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गाईड म्हणून पोलिसांची मदत करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाचं कौशल बघून भारतीय सैन्यदलानं त्यांना गुप्तहेर म्हणून भरती करून घेतलं. कारण होतं… त्यांची असाधारण बुद्धीमत्ता आणि कौशल्य. पशुपालन करुन उपजीवीका भागवणाऱ्य रणछोड पागींना वाळवंटातल्या पावलांचा इतका अभ्यास होता की पावलांच निशाण बघून पाकिस्तानी सैन्याच्या हलचालींबद्दल योग्य ते कयास लावण्यात यशस्वी व्हायचे.

बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ)चे जवानांनी ‘ओल्ड वॉर कॅमल’ च्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या उंठाच्या पाग्यांची नेमणूक गुजरात वाळवंटातील पाकिस्तानी घुसखोरी रोखण्यासाठी केली होती.

रणछोड पागी आणि त्याच्या समाजातील राबडी लोकांचा अभ्यास इतका दांडगा होता की वाळवंटातील पावलांचे ठसे बघून किती लोकांनी घुसखोरी केली. किती किलोचे साहित्य त्यांनी घोड्याच्या पाठीवर लादलं होतं. किती वेगात ते गेले. एखाद्या ठिकाणी किती वेळ त्यांनी आराम केला होता इत्यादी इत्यंभूत माहिती भारतीय सैन्याला द्यायचे.

भारतीय सैन्याला मिळणारी ही माहिती खुप गरजेची होती. यामुळं बऱ्याच जणांचा जीव तर वाचलाच सोबतच पाकिस्तानी सैन्याच्या पुढील चाली लक्षात घेण्यास मदत झाली. वाळवंटी क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानामुळं १९६५ च्या युद्धात भारतीय सैन्याला मोठी मदत झाली. छारकोट आणि विद्याकोट या पोस्टना ताब्यात घेण्यात भारतीय सैन्याला आलेल्या यशात राबडी समुहाचा सिंहाचा वाटा होता.

रणछोड पागीनं जीवाचीही परवा केली नाही

कच्छच्या वाळवंटातून घुसन पाकिस्तानी सैन्यानं विद्याकोट नावाची अत्यंत महत्वाची पोस्ट ताब्यात घेतली. ही पोस्ट सोडवणं गरजेचं होतं. भारतीय सैन्यानं यासाठी शर्थीची प्रयत्न केले. १०० जावान शहिद होऊन सुद्धा ही पोस्ट जिंकणं कठीण जात होतं. १० हजार सैन्याची तुकड़ी पाठवण्याची भारतानं तयारी केली. पण ही तुकडी पाकिस्तानी सैन्याची तुकडी पोस्टवर पोहचणं गरजेचं होतं.

भारतीय गुप्तहेर , रणछोड पागी आणि राबडी समुहातील लोकांना लपलेल्या पाकिस्तानी सैन्याला शोधायचं होतं. त्यांनी जीवाची पर्वा केली नाही रात्रं दिवस पाकिस्तानी सैन्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. म्हणून लपून बसलेल्या १२०० सैनिकांना त्यांनी शोधून काढलं. यामुळं भारतीय सैन्याचा विजय झाला.

पाली पोस्ट आणि १९७१चं युद्ध

१९७१ च्या युद्धा दरम्यान पाली नगर पोस्टवर भारतीय सैन्याला पोहचवण्यासाठी मोठी मदत झाली होती, ती राबडी समुदायाची. भारतीय सैन्यदलाचे प्रमुख सॅम मानिक शॉ यांनी हेलिकॉप्टर पाठवून राबडी समुहातील पराक्रमी लोकांनी भेटायाला बोलावलं. त्यांच्यासोबत भोजन केलं आणि त्यांना त्यावेळी ३०० रुपयांच बक्षिसही दिलं.

मशर्रफ नावाच्या उंटाला राबडींनी रोखलं

१९९५ आणि १९७१च्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या राबडींना संग्राम पदक, समर सेवा स्टार आणि पोलिस पदकानं सम्मानित करण्यात आलं. तसेच दरवर्षी स्वातंत्र्य दिनाला गावात ध्वजारोहणाचा मानही दिला. आगामी वर्षात राबडींनी भारतीय सैन्यदालाची मोठी सेवा केली. १९९८ला त्यांनी ‘मुशर्रफ’ नावाच्या उंठाला शोधलं आणि रोखलं. या उंठावर २२ किलो आरडीएक्स लादलं होतं.

वर्ष २०१३ला या समाजातील सर्वात हुशार गुप्तहेरानं सेवानिवृत्ती घेतली. त्यांच ११२व्या वर्षी निधनं झालं. बीसीएफनं त्यांच्या सन्मानात बासनकंठाच्या पोलिस चौकीला त्यांचं नाव दिलं, ‘रणछोड पागी.’ पुढं गुजरात पोलिसांनी या समाजातील अन्य गुप्तहेरांना ‘पोलिस पागी’ अशी उपाधी दिली. आजही या समाजातले लोक गुजरातच्या ५४० किमी सीमेची राखण करायला मदत करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER