कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा केंद्राने थांबवला; राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत असताना वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे देशभरातील इतर राज्यांतून ऑक्सिजनची मागणी केली आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास सुरूवात झाली. मात्र, आता केंद्राने कर्नाटकहून राज्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणे योग्य नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत. रोज राज्याला १ हजार ७५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असते. परंतु, कर्नाटकने ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्यामुळे अडचणी येणार आहेत.

ही बातमी पण वाचा : आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरली जाणार; राजेश टोपेंची माहिती

या संदर्भात राजेश टोपे यांनी ट्विट केले आहे. “प्रशासनाने उत्पादकांना १ हजार ७१३ टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे. ४ मे रोजी राज्यात १ हजार ७२० टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या २५७.५ टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून ११६.५ टन, भिलाई छत्तीसगड येथून ६० टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून ८१ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे. ५ मे साठी उत्पादक १ हजार ६६१ टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत, असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे.” अशी संपूर्ण माहिती टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button