ऑपरेटिंग, कमर्शियल संघ विजयी; डीआरएम चालेंज क्रिकेट चषक

cricet drm cup

नागपूर :- ऑपरेटिंग आणि कमर्शियल संघाने प्रतिस्पर्धीवर मत करीत पुढील फेरती प्रवेश निश्चित केला. आज गुरुवारी सेंट्रल रेल्वेच्या अजनी येथील मैदानावर ऑपरेटिंग आणि टीआरडी दरम्यान पहिला सामना तर व्यावसायिक विभाग आणि इलेक्ट्रिकल विभाग यांच्यात लढत झाली. रेल्वेतर्फे आंतर रेल्वे विभाग डीआरएम चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे.

पहिला सामना ऑपरेटिंग विरुद्ध टीआरडी संघात रंगला होता. टॉस जिंकून प्रथम फेरीत निवड झाली. ऑपरेटिंगने नाणेफेक जिंकून टीआरडीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑपरेटिंगच्या भेदक माऱ्यापुढे टीआरडीचा संघ फलंदाजीत फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या १६ षटकात ५९ धावत टीआरडीचा संघ कोलमडला. परितेश जयकर (17), संदीप यादव (16) यांच्या शिवाय इतर कुठलाही खेळाडूला दोन अंकी धावा करता आल्या नाही. ऑपरेटिंगतर्फे राकेश मालवी 4 बळी. पंकज कुमार 3 बळी घेतले.

प्रत्युतरात ऑपरेटिंगने उत्कृष्ट फलंदाजी करीत अवघ्या 3 षटकात तीन गाड्यांच्या बदल्यात लक्ष गाठले. ऑपरेटिंगने हा सामना ७ गडी राखून जिंकला. महेश बावणे (17), विकास जिहाद नाबाद (13), नवीन तिवारी (10) यांनी उत्कृष्ट योगदान दिले. ऑपरेटिंगचा राकेश मालवी सामनावीर ठरला.

दुसरा सामना व्यावसायिक (कमर्शियल) आणि इलेक्ट्रिकल विभागात रंगला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेला इलेक्ट्रीकलचा संघ ६० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जिगर (16), सतीश भालावी (09) धावा केल्या. व्यावसायिकतर्फे प्रवीण बेहरे 3, शशांक मानवटकरने 3 बळी घेतले. तर काशीफ कुरेशी, ओम पाथरेव्ह, प्रवीण सिन्हा यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

प्रत्युत्तरात आलेल्या व्यावसायिकच्या फलंदाजांनी फटकेबाजी करीत अवघ्या 1.4 षटकांत एक गडी गमवित लक्ष गाठले. प्रवीण सिन्हा नाबाद (27), शशांक मानवटकर नाबाद (23) धावा केल्या. कमर्शियलने 9 गडी राखून हा सामना जिंकला. कमर्शियलचा शशांक मानवटकर सामनावीर ठरला.

उद्या शुक्रवारी पहिला सामना टीआरओ आणि मेडिकल दरम्यान तर दुसरा सामना आरपीएफ आणि वैयक्तिक खाते (पर्सनल अकाउंट) यांच्यात रंगणार आहे.