आजपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांची चिंता वाढली

The onset of unseasonal rains in many parts of the state from today has raised concerns among farmers

मुंबई :- देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली (Fear of rains raised concerns among farmers) आहे. दिवसा घामाच्या धारा आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आजपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. आजपासून चार दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात १८ ते २१ मार्चदरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हातात आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER