
दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची कथितरीत्या विक्री आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरांवरून काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी पुन्हा मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली. ‘पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा’ म्हणत सरकार जनतेची लूट करते आहे, असा आरोप केला.
राहुल गांधींनी ट्विट केले – केंद्र सरकारची दोन्ही हातांनी दिवसा लूट. गॅस-डिझेल-पेट्रोलवर जबरदस्त करवसुली आणि मित्रांना पीएसयू-पीएसबी विकून जनतेकडून हिस्सा, रोजगार आणि सुविधा हिरावून घेणे. पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत काँग्रेस सतत सरकारवर टीका करते आहे. सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांवर कर लावून २१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल गोळा केला, असा काँग्रेसचा आरोप आहे.
संसदेतही काँग्रेसने यावरून गदारोळ केला होता. यावर चर्चेची मागणीही केली होती. २०२१ या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४.८७ रुपये लिटर आणि डिझेलच्या दरात ४.९९ रुपये लिटर वाढ करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील अनुपपूर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी इंधनाच्या दराने शंभरी पार केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
केंद्र सरकार की दोनों हाथों से दिनदहाड़े लूट-
1. गैस-डीज़ल-पेट्रोल पर ज़बरदस्त टैक्स वसूली।
2. मित्रों को PSU-PSB बेचकर जनता से हिस्सेदारी, रोज़गार व सुविधाएँ छीनना।
PM का एक ही क़ायदा,
देश फूँककर मित्रों का फ़ायदा।— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला