‘जीतकर हारनेवाले को केकेआर कहते है’, शाहरूखने मागितली माफी

KKR - Sharukh Khan - Maharastra Today
KKR - Sharukh Khan - Maharastra Today

बहुतेकांना असे वाटत होते की कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यावेळी तरी मुंबई इंडियन्सवर (MI) विजय मिळविण्यात यशस्वी ठरेल. 27 सामन्यात फक्त सहा विजय आणि 21 पराभव हे अंतर माॕर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात ते कमी करतील. आणि मुंबईला 152 धावांत बाद केल्यावर याची खात्रीसुध्दा वाटत होती. 15 व्या षटकापर्यंत 4 बाद 122 अशा चांगल्या स्थितीत ते होते. दिनेश कार्तिक व आंद्रे रसेलसारखे फलंदाज होते तरीसुध्दा पुढच्या पाच षटकात त्यांना फक्त 20 धावाच जमवता आल्या आणि पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला. गेल्या 11 सामन्यात 10 व्यांदा आणि 28 सामन्यात 22 व्यांदा केकेआरने मुंबईसमोर हार पत्करली.

यानंतर साहजिकच सोशल मीडियावर केकेआरसंदर्भात काॕमेंटसचा पूर आला. मुंबईकडून हरण्याचे नवानवीन मार्ग हा संघ शोधून काढतो, त्यांच्या या कल्पकतेला सलाम, अशी प्रतिक्रिया उमटली. काहींनीतर मॕच फिक्सिंगचीही शक्यता वर्तवली.

साहजिकच केकेआरचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) नाराज झाला आणि त्याने केकेआरच्या चाहत्यांची माफीसुध्दा मागितली आहे. शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय..निराशाजनक कामगिरी! काय बोलावे..केकेआरच्या सर्व चाहत्यांची मी माफी मागतो.

Disappointing performance. to say the least @KKRiders apologies to all the fans!

जसप्रित बुमराने म्हटलेय की, जे खेळ सारे काही संपलेय अशा स्थितीतून जिवंत होतात ते मला आवडतात. माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी म्हटलेय की केकेआरने हा सामना सहजपणे जिंकायला हवा होता. खेळपट्टीपेक्षा मनस्थितीमुळे ते हा सामना हारले. नशीबाने पूर्ण साथ देऊनही ते जिंकू शकले नाहीत असे आकडेवारी तज्ज्ञ दीपू नारायणन यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार जाॕय भट्टाचार्य यांनी म्हटलेय की ते मैदानावर नाही तर डोक्यातून हे सामना हरले. सामन्यातील 35 षटके वरचढ राहाणारा संघ शेवटी हारत असेल तर वाईट वाटते. तरुण खेळाडूंनी आपले काम केले होते पण अनुभवी इंटरनॅशनल स्टार्स त्यांची कामगिरी करु शकले नाहीत.

गोलंदाजांचा चांगला वापर केल्याबद्दल काहींनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली आहे. आंद्रे रसेलला मिळालेल्या जीवदानाचाही फायदा घेता आला नाही यावर बहूतेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिला क्रिकेटपटू रीमा मल्होत्रा हिने म्हटलेय की जो हारे हुए मैच को रोमांचक बना दे वह है मुंबई पलटन! अनबिलिव्हेबल विन!! रसेल अर्नाल्डने म्हटलेय की स्वतः मुंबईलासुध्दा या विजयाचे आश्चर्य वाटले असेल. वेंकटेश प्रसादने म्हटलेय की अखेरच्या 5 षटकात 31 धावांचे रक्षण करणे ही अफलातून कामगिरी आहे. सामन्याला मुंबईने विलक्षण कलाटणी दिली.

पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणायची कला मुंबई इंडियन्सकडे आहे म्हणूनच तर ते चॕम्पियन आहेत असे आकाश चोप्राने म्हटले आहे. केकेआर तर पराभवाचे वेगवेगळे मार्ग शोधुन काढतेय की काय, असे वाटते. एकाने टोमणा मारलाय की ‘ हार के जितने वाले को बाजीगर कहते है, और जित कर हारनेवालोंको केकेआर कहते है!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button