
मुंबई :- स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोणतीही जात नसते. शिवसेना नेते संजय राठोड यांची मुसक्या आवळून चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. ज्या समाजाचे संजय राठोड आहेत, पूजा चव्हाणही त्याच समाजाची होती. आमच्या लेखी जातीला महत्व नाही. “बंजारा समाजातील नेते फोन करून याप्रकरणाबाबत चौकशीची मागणी करत आहेत. बंजारा समाज पाठीशी असल्याचे चित्र वाघ यांनी सांगितले.
चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या पोहरादेवी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “एरवी पोलीस संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या झाल्यास आजुबाजूच्या लोकांचीही पोलीस ठाण्यात चौकशी करतात. मात्र, पोलिसांनी पूजा चव्हाणप्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या संजय राठोड यांची चौकशी न करता महिला आयोग व मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. हे कसे होऊ शकते.” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
ही बातमी पण वाचा : संजय राठोड यांच्यावर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला