बाळासाहेब आणि माझ्या मुलींची शपथ ! माझ्यावरील आरोप धादांत खोटे- अनिल परब

Anil Parab

मुंबई :- परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर आता एनआयएच्या (NIA) अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब (Anil Parab) यांनी उत्तर देत फेटाळून लावले. तसेच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी स्पष्ट केलं.

परब म्हणाले की, आज सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र दिलं. त्या पत्रात त्यांनी माझा उल्लेख केला आहे. मी सचिन वाझे यांना बोलावलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. २०२० च्या जून, ऑगस्टमध्ये सचिन वाझे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये ट्रस्टींकडून ५० कोटी जमा करण्याचे आदेश मी त्यांना दिले, असा गंभीर आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये मी मुंबई महापालिकेचा क्रॉन्ट्रक्टरकडून प्रत्येकी दोन कोटी जमा करण्याच्या सूचना दिल्या, असा दुसरा आरोप त्यांनी केला. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक आहे. माझ्यावर अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाही. म्हणून मी माझ्या दोन मुली आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आले आहेत.

भाजपचे (BJP) पदाधिकारी आरडाओरड करत होते. या प्रकरणात आम्ही तिसरा बळी घेऊ, असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरून त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्यांनी  केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदाराशी  माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे, हा योजनेचा भाग आहे. तसं करून मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या दिशेला वळवले जात आहे. मी कुठल्याही चौकशीला तयार आहे, वाटल्यास नार्कोटिक्ससाठीही  तयार आहे. ज्या शिवसैनिकांना माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी असं कधीही करणार नाही हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी मागितले २ कोटी , मंत्र्यावरही आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button