रेस्टॉरंटच्या मेनूकार्डमध्ये लिहावे लागणार आहाराचे न्यूट्रिशन व्हॅल्यू

FSSAI - Restaurants - Nutritional Value

नवी दिल्ली : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) (FSSAI) ने मेनूकार्डच्या नियमावरून एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्याअंतर्गत आता रेस्टॉरंटच्या मेनूकार्डमध्ये आहाराचे न्यूट्रिशन व्हॅल्यू लिहिणे आवश्यक असेल. ज्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या त्या जेवणात किती कॅलरीज आहेत याची माहिती मिळू शकेल. इतकेच नाही तर मेनूकार्ड तयार करताना पोषक तत्त्वांची मात्रा ही लिहावी लागणार आहे. शासनाचे हे नवीन नियम एखाद्या रेस्टॉरंटच्या १० किंवा त्यापेक्षा अधिक शाखा असलेल्यांना एफएसएसएआयकडून लागू असेल. याआधीच यासंदर्भातील नियमांच्या सुधारणांसाठी प्रयत्न सुरू होते. आता मेनूकार्ड नियमावरील सूचना जारी करण्यात आली आहे.

एफएसएसएआयकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, हे नियम फक्त १० शाखा असलेल्या रेस्टॉरंट्संनाच लागू असतील. त्यानुसार सेंट्रल लायसन्स घेणाऱ्या किंवा दहापेक्षा जास्त ठिकाणी रेस्टॉरंट असणाऱ्या कंपन्यांना मेनूकार्डमध्ये कॅलरीची माहिती देणे बंधणकारक असेल. तसेच मेनू कार्डमध्ये की कोणत्या व्यक्तीसाठी किती कॅलरी असणे आवश्यक असते, हे ही लिहावे लागेल.

भारत सरकारच्या या अधिसूचनेनुसार, मेनू आयटम, डिस्प्ले बोर्ड किंवा खाद्यपदार्थावरील न्यूट्रिशन व्हॅल्यू मेनूकार्डमध्ये माहिती देणे आवश्यक आहे. पिझ्झा, बर्गर विकणाऱ्या पिझ्झा हट, डोमिनोज, मॅकडोनाल्ड सारख्या साखळी रेस्टॉरंट्संना देखील आपल्या खाद्यपदार्थांच्या कॅलरीबद्दल सांगावे लागणार आहे. यासह, हॉटेल आणि मोठ्या रेस्टॉरंट्संना देखील आपल्या मेन्यूकार्डमध्ये खाद्यपदार्थात किती कॅलरी आहेत हे ही सांगावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER