राज्यात करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले

Maharashtra Coronavirus Recovery Rate

मुंबई : राज्यात आज देखील करोनाबाधितांपेक्षा (Coronavirus) करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे पुढे आले आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्नालयातून सुटी देण्यात आली. याशिवाय, ७० रुग्णांचा करोनामुळे दिवसभरात मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे.

याशिवाय, राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या राज्यातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या ७१ हजार ९१० असून, १७ लाख ४७ हजार १९९ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख २ हजार ४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER