
रत्नागिरी(प्रतिनिधी): मुंबईसह पुण्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची संख्या आता 90 हजारांच्या आसपास पोचली आहे. जिल्ह्यात 89 हजार 198 जण होम क्वारंटाईन तर 203 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
बाहेरून येणाऱ्या लोकांसोबतच स्थानिकांनी देखील पुरेशी काळजी न घेतल्याने जिल्ह्यातील कोरोना पेशंटचे प्रमाण वाढले आहे. रोजच्या रोज जिल्ह्यात दाखल होणारे नागरिक आणि नियमितपणे उघडलेली बाजारपेठ यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार जोरदार होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला