सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांवर

Corona News

मुंबई :- राज्यातील कोरोनाची स्थिती पाहायची झाली तर कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नव्या कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांवर गेली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे १० हजार १८७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात दिवसभरात ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्युदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६,०८० रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येतदेखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्यूच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज(शनिवार) राज्यात १० हजार १८७ नवीन कोरोनाबाधित वाढले. ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण २०,६२,०३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६७,७६,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,०८,५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,२८,६७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर ४,५१४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ५२ हजार ४४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER