रत्नागिरी जिल्ह्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या घरात

Home Qurantine

रत्नागिरी : जिवाच्या भीतीने रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी चाकरमान्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज अखेर जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या जवळपास पोहचली आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ६९ हजार ७९९ वर पोहचली असून संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या १९३ आहे. संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ३७, उपजिल्हा रुग्णालय कामथे, उपजिल्हा रुग्णालय कळबणी २३, ग्रामीण रुग्णालय दापोली ४, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर १, तहसिलदार दापोली ५, तहसिलदार खेड ४९, तहसिलदार रत्नागिरी २८, तहसिलदार गुहागर १२, तहसिलदार राजापूर २५ असे मिळून एकूण १९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER