राम मंदिरासाठी दान रकमेचा आकडा असा लिहिला की देवनागरीत दिसतो …

Ayodhya Ram Mandir - Unique Donation

नवी दिल्ली : अयोध्येच्या (Ayodhya) राममंदिरासाठी (Ram Mandir) सुरू असलेल्या निधी संकलनात एका भक्ताने दिलेल्या दानाचा चेक त्याच्या रकमेपेक्षा दानाची रकम लिहिण्यातही राम नामाचे स्मरण करून देतो ! म्हणून लक्षणीय ठरला आहे.

राम कूलर तर्फे चेक देणाऱ्या या भक्ताने मंदिरासाठी दोन लाख चौदा हजार दोनशे चौदा रुपये दान दिले आहेत. त्याने हा २१४२१४ हा आकडा इंग्रजीत अशा कल्पकतेने लिहिला आहे की देवनागरीत तो ‘रामराम’ दिसतो! स्वाभाविकच या चेकची जोरदार चर्चा सुरू आहे. मुकेश अग्रवाल यांनी या चेकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER