राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १९०, तर १२ हजार ५६१ रुग्ण बरे

Coronavirus

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज राज्यात नव्या २ हजार ६०८ रुग्णांची भर पडली आहे.

त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १९० वर पोहचली आहे. तर राज्यात आज दिवसभरात ८२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, १२ हजार ५६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १ हजार ५७७ वर पोहचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाणे १ आणि नांदेडमध्ये १ मरण पावला आहे. मुंबईत आज दिवसभरात १ हजार ५६६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता २८ हजार ८१७ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात एकूण ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ९४९ झाली आहे.

Check PDF : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १९० तर, १२ हजार ५६१ रुग्ण बरे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER