मुंबईत कोरोनाबळींचा आकडा लपवला जातोय; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray - Maharashtra Today
Devendra Fadnavis - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील कोरोना (Corona) बळींचा आकडा लपवला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफीलपणा या काळात परवडणार नाही. म्हणूनच, चाचण्यांच्या तुलनेत संक्रमणाचा दर आणि बळी पडण्याची अचूक संख्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आधार प्रदान करू शकते, असे फडणवीस यांनी या पत्रात नमूद केले आहे.

आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मर्यादित होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतु, हा शिखरावरचा वेळ कमी कसा करता येईल आणि आपत्ती कशी कमी होईल, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, नागपुरात २६ हजार ७९२ चाचण्या रोज होते. ६८ लाखांच्या पुण्यात २२ हजार चाचण्या प्रतिदिन इतकी आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार चाचण्या होतात. शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही आणि यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

मुंबईच्या बाबतीत आपण फार काळजीपूर्वक काम केले पाहिजे. कारण, संक्रमित लोक गावी निघालेत. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या ७ दिवसांत ४ हजार ४६० मृत्यू नोंदण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणार नाही. त्यामुळे मुंबईत चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्या लागतील; शिवाय राज्याच्या अन्य भागातसुद्धा ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे RT-PCR चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button