देशात कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर

Coronavirus

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काही अंशी कमी झालेली कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ८० हजार ७७२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १ हजार १७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गेल्या २४ तासांत देशात ८० हजार ४७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहचली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे देशात ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ९७ हजार ४९७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

याव्यतिरिक्त देशात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी देशात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

दरम्यान, कोविड -१९ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीवर बोलताना उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यांनी सांगितले की, भारत बायोटेकच्या लस चाचणीत लखनौ आणि गोरखपूरमधील प्रत्येकी १,५०० लोक समाविष्ट असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER