जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५४,८८,८२५ तर भारतात १,५८,३३३

Coronavirus

मुंबई :- जगात आज (२८ मे) कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५४,८८,८२५ झाली आहे. ३,४९,०९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५५८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे ८४,३१४ रुग्ण आढळले आहेत.

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,५८,३३३ आहे. ४५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६५६६ नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात हा आकडा ५६,९४८ रुग्ण. १८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २१९० नवे रुग्ण आणि १०५ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ६.३६ टक्के, भारतात २.८६ टक्के आणि महाराष्ट्रात ३.३३ टक्के आहे.

ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. ही आकडेवारी २8 मेच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 5488825 तर भारतात 158333


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER