कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढते आहे

Maharashtra Coronavirus Recovery Rate

मुंबई : कोरोनाचे (Corona) रुग्ण बरे होण्याची संख्या रोज वाढते आहे, हे चांगले लक्षण आहे. आज दिवसभरात राज्यात ४,५१६ रुग्ण बरे झालेत. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ९४ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.

राज्यात आज २, २९४ नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. आज ५० रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत राज्यात ५०, ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळलेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृह तर, १,९९६ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER