भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १ लाख २५ हजारांवर

Corona Virus India

मुंबई : मागील २४ तासांत भारतात कोरोनाचे ६ हजार ६५४ नवे रुग्ण आढळले आहेत. १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आता देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ७२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

५१ हजार ७८४ रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४१.३९ टक्के आहे. देशात सर्वाधिक ४४, ६४२ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल नवे २९४० रुग्ण आढळले आहेत. काल ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २८.१८ टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत १ हजार ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत २७ हजार २५१ कोरोनाचे रुग्ण सा

पडले आहेत.  ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रानंतर रुग्णांची संख्या जास्त असलेली तीन राज्ये :

तामिळनाडू – १४, ७५३ रुग्ण. ७१२८ बरे झाले. मृत ९८. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.३१ टक्के
गुजरात – १३, २३८ रुग्ण. ५८८० बरे झाले. मृत ८०२. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४४.४१ टक्के
दिल्ली – १२, ३१९ रुग्ण. ५८९७ बरे झाले. मृत २०८, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.८६ टक्के

जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाची साथ पसरली आहे. रुग्णांची संख्या ५३ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मागील २४ तासांत जगात १,०७,७०७ नवे रुग्ण आढळले आहेत व ५,२४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER