भारतात कोरोना रुग्णांची संख्या १,९८,७०६; नवे ८,१७१

Corona Virus

मुंबई : भारतात आज २ जून रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,९८,७०६ आहे. ५,५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ८,१७१ नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा ७०,०१३ रुग्ण, गेल्या २४ तासांत २,३६१ नवे रुग्ण, एकूण मृत्यू २,३६२ आणि गेल्या २४ तासांत ७६ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ६.१३ टक्के, भारतात २.८२ टक्के आणि महाराष्ट्रात ३.३७ टक्के आहे.

दरम्यान, जगात रुग्णांची संख्या ६०,५७,८५३ झाली आहे. एकूण ३,७१,१६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४,००० रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,२२,९१७ रुग्ण आढळले आहेत.

ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी २ जूनच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER