अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हजाराच्या पार

Amravati - Coronavirus

अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आलेल्या कोरोना(Corona Virus) चाचणी अहवालात १४ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०७२ झाली आहे. गेल्या शनिवारपासून अमरावतीत कोरोनाच्या(Amravati Corona Virus) रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज १० – १५ ने वाढत होती. मात्र, गेल्या शनिवारपासून दररोज ६० पेक्षा रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी सर्वाधिक ६५ रुग्ण आढळले होते.गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात सुरज नगरमधील ३१ वर्षीय पुरुष, राहुल नगरमधील ३९ वर्षीय महिला, रामपुरी कॅम्पमधील ४५ वर्षांचा पुरुष, बडनेरातील ६१ वर्षीय महिला, सुजिया नगरातील ५० वर्षीय महिला, पूर्णा नगरातील ६०वर्षीय पुरुष, खापर्डे बगिचा येथील ६४वर्षीय महिला, अंबिका नगरातील १० वर्षीय मुलगा, नागपुरी गेट येथील ४२ वर्षीय पुरुष, हनुमान नगरातील ३८ वर्षीय पुरुष, अंबिका नगरातील ६५ वर्षीय महिला, निषाद कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, अंबिका नगरातील ५ वर्षीय बालक व अंबिका नगर येथील ७२ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत ६६७ रुग्ण बरे झाले असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER