अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार

Louise Glück

नवी दिल्ली : अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक (Louise Glück) यांना २०२० सालचा साहित्यातला नोबेल पुरस्कार (Nobel Prize in Literature) जाहीर झाला आहे. गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. स्वीडीश अकादमीने आज या पुरस्काराची घोषणा केली आहे.

त्यांना अद्वितीय काव्यरचनेसाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ७७ वर्षांच्या लुईस ग्लूक येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक होत्या. त्यांना अमेरिकेत साहित्यातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER