नायजेरियन सरकारने दिली ‘कू” ला पसंती

koo - Nigerian PM - Maharashtra Today

नायजेरिया सरकारने गेल्या आठवड्यात मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘ट्विटर’वर अनिश्चित काळासाठी बंदी घातली. नायजेरिया सरकारने भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कु’ वर अधिकृत अकाउंट उघडल्याची बातमी गुरुवारी आली !

कु चे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी ट्विटरवर या संदर्भात पोस्ट टाकली. पोस्टमध्ये अप्रमेय म्हणतात,’ कु इंडियावर नायजेरियन सरकारच्या हँडलचे स्वागत. आता भारताबाहेर ही आम्ही पंख पसरवतो आहोत.’ गेल्या आठवड्यात नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचे एक ट्विट ट्विटरने हटविले होते. त्यानंतर नायजेरियाने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.

भारतीय कु मायक्रोब्लॉगिंगची सुरवात गतवर्षी अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी केली असून अनेक भारतीय भाषा त्यावर उपलब्ध आहेत. २०२० ऑगस्ट मध्ये ‘आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज’ कु ने जिंकले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये देशवासियांना कु चा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून कु चर्चेत आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button