नाशिक शिवसेनेचा अभेद्य गड होणार, पुढचा महापौरही शिवसेनेचाच असेल; संजय राऊतांचा दावा

नाशिक :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तिन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. तरदुसरीकडे आज नाशिकमध्ये शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला (BJP) जोरदार धक्का दिला. नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप नेते वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी शिवबंधन हाती बांधत सेनेत प्रवेश केला.

गीते आणि बागुल यांच्या पक्षप्रवेशानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या दोघांचा पक्षप्रवेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत होणार होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी चर्चा करूनच नाशिक येथेच त्यांना पक्षात प्रवेश दिला. गीते आणि बागुल यांची घरवापसी झाली आहे. नाशिकला शिवसेनेचा अभेद्य गड बनवण्यासाठी त्यांची साथ जरुरी आहे. त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक शिवसेनेचा गड होईल यात काही शंका नाही, असा दावाही त्यांनी केला.

शोभा मगर, दायमाही शिवसेनेत प्रवेश करतील, ते माझ्या संपर्कात आहे. त्यांना शिवसेनेत यायची इच्छा आहे, राजकारणाची हवा बदलते आहे, पुढचा महापौर हा नक्कीच शिवसेनेचा असेल, त्याबाबत कुठलीही साशंकता नाही, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवारांनी विरोधी पक्षाचं, तर राहुल गांधींनी काँग्रेसच नेतृत्व करावं’, – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER